कझाकिस्तानमध्ये पक्ष्यांच्या धडकेने विमान कोसळून ४२ प्रवाशांचा मृत्यू

0
कझाकिस्तानमध्ये पक्ष्यांच्या धडकेने विमान कोसळून ४२ प्रवाशांचा मृत्यू
कझाकिस्तानमध्ये पक्ष्यांच्या धडकेने विमान कोसळून ४२ प्रवाशांचा मृत्यू

बाकू (Baku), दि. २५ : आज सकाळी कझाकस्तानमध्ये अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कोसळून भीषण अपघात झाला. या विमानाचे अक्षरश: तुकडे झाले आहेत. देशाच्या आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले की, विमानात ७० लोक होते आणि किमान ३० जणांचा मृत्यू झाल्याची जीती व्यक्त केली जात आहे, तर अनेक स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मृतांची संख्या ४२ वर पोहोचली आहे. अपघातापूर्वी वैमानिकांनी आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी मागितली होती, अशी माहिती समोरे आली आहे. हे विमान अझरबैजानहून रशियाच्या चेचन्या प्रांताची राजधानी ग्रोझनीकडे जात होते. पण त्याला कझाकिस्तानच्या अकताऊ शहरापासून 3 किमी अंतरावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर कझाकस्तानमधील अकताऊ शहराजवळ विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. विमान कोसळून त्याचे दोन तुकडे झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हे विमान हवेत असताना पक्ष्यांच्या थव्याला धडकले आणि त्यानंतर विमानाच्या ऑक्सिजन टँकचा स्फोट झाला, असेही सांगितले जात आहे. फुटेजमध्ये दिसत आहे की, विमान उतरताच आगीच्या गोळ्यात रुपांतरित होते आणि विमानाचे तुकडे-तुकडे झाले. अझरबैजान एअरलाइन्सचे J2-8243 क्रमांकाचे विमान कझाकस्तानच्या अक्तू शहराजवळ आपत्कालीन लँडिंगच्या प्रयत्नात असताना आग लागली. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान रशियाच्या ग्रोझनी शहराकडे जात होते पण धुक्यामुळे त्याने मार्ग बदलला, फुटेजमध्ये दिसत आहे की, लँडिंग गिअर खाली ठेवून विमान भरधाव वेगाने जमिनीच्या दिशेने जात आहे आणि उत्तरताच त्याला आग लागली.