
(Sangmaner)संगमनेर : महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी 40 जागा महाविकास आघाडीच्या येतील असे (Former Revenue Minister Balasaheb Thorat)माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. निळवंडे धरणाचे पाणी संगमनेर तालुक्यात पोचल्या नंतर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निळवंडे गावात पाण्याचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
संगमनेर तालुका अशांत कसा होईल याकडे काही लोक लक्ष देत असल्याचे थोरात यांनी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये जो ज्या जागेवर ताकदवान आहे, तिथे त्यांना ताकद देणे, कुणाचेही खच्चीकरण न करणे हा (Sharad Pawar)शरद पवार यांचा सल्ला योग्यच असल्याचेही थोरात यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी निळवंडे धरणातून पाणी सोडन्याच्या चाचणीचे उद्घाटन (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. हे पाणी संगमनेरातील दुष्काळी भागात पोहचल्यावर तळेगाव दिघे गटातील लोकांनी एकच जल्लोष केला. या लोकांच्या आनंदात संगमनेर तालुक्याचे आमदार व कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात सहभागी झाले होते.