
बीड BEED – बीड जिल्ह्यात गतवर्षात विविध आंदोलना दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या घटनांमुळे बीड जिल्हा राज्यात चर्चेत आला.अशा घटना पुन्हा घडू नये त्यासाठी बीडचे पोलीस दल आगामी वर्षात सज्ज झाले आहे. 30 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण आंदोलनदरम्यान झालेल्या जाळपोळ दगडफेक प्रकरणातील 307 आरोपी अटकेत आहेत व फरार आरोपींचा शोध घेत आहे तसेच बीडमधील घटनेच्या एस आयटी चौकशीसाठी प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.