
मागच्या 3 दिवसांत 6 दहशतवाद्यांचा खात्मा; आज संरक्षणमंत्र्यांचा दौरा
(Jammu and Kashmir) : गुरुवारी सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील अवंतीपोरा येथील त्राल येथे सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार मारले. लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांच्यामध्ये एक टॉप कमांडर आसिफ शेखदेखील होता.
याशिवाय आमिर नजीर वाणी आणि यावर अहमद भट्ट यांचाही मृत्यू झाला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने जाहीर केलेल्या १४ दहशतवाद्यांच्या यादीत या तिघांचाही समावेश होता. तथापि, अधिकाऱ्यांनी अद्याप दहशतवाद्यांच्या मृत्यूची पुष्टी केलेली नाही.
गेल्या तीन दिवसांत जम्मू आणि काश्मीरमध्ये ही दुसरी चकमक आहे. यापूर्वी १३ मे रोजी शोपियान जिल्ह्यातील केलर येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चे तीन दहशतवादी मारले गेले होते. बुधवारी केलरमधूनच शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता.
दुसरीकडे, बुधवारी केंद्र सरकारने सांगितले की ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारतीय हवाई दलाने चीनची संरक्षण यंत्रणा जाम केली आणि पाकिस्तानचे नूर खान आणि रहीम यार खान हवाई तळ २३ मिनिटांत उद्ध्वस्त केले. भारतीय संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानची शस्त्रे नष्ट केली.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने बुधवारी ही माहिती दिली. PIB ने सांगितले की हे काम भारतीय संरक्षण प्रणाली पेचोरा, OSA-AK आणि आकाश क्षेपणास्त्र प्रणालीसह केले गेले. ही शस्त्रे चीन-तुर्कीने पाकिस्तानला दिली होती.















