
अमरावती – अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील वडगाव फत्तेपुर येथील शासकीय विद्यालयातील (आश्रमशाळा) विद्यार्थ्यांनी सकाळी पोहे खाल्ले आणि लगेच 25 ते 30 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. सकाळी मुलींनी पोहे खालले आणि आश्रमशाळेतील पाण्याचं फिल्टर बंद असल्याने मुलींनी पाणी पिलं नाही. एक-दोन तासांनी मुलींना त्रास होत असल्याने त्यांना तातडीने अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती डॉ कांचन जवंजाळ आणि तहसीलदारडॉ. संजय गरकल यांनी यावेळी दिली.