शिक्षक महासभा नागपूर चे २४वे जिल्हा अधिवेशन

0

महाराष्ट्र राज्य उच्च श्रेणी मुख्याध्यापक व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक महासभा नागपूर चे २४वे जिल्हा अधिवेशन व सत्कार समारंभ २०२५ दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ ला मौदा येथील धनजोडे सभाग्रहात आयोजित करण्यात आले आहे.

या अधिवेशनाला मा ना . चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) महसूल मंत्री म . रा . मा ना आशिष जयस्वाल राज्यमंत्र म . रा . मा चरणसिंग ठाकूर आमदार . मा आ सुधाकर अडबाले . शिक्षक आमदार . मा टेकचंद जी सावरकर माजी आमदार . मा विपूल जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि पं नागपूर . मा कुमुदिनी श्रीखंडे मुख्य लेखा व वित अधिकारी जिप नागपूर . मा सिध्देश्वर काळूसे शिक्षणाधिकारी जि प नागपूर . मा तापेश्वर वैद्य मा देवेन्द्रजी गोडबोले . व सोबतच डी . डी . पाटील राज्य सरचिटणीस महाराष्ट्र पेन्शनर्स महासंघ . बुधाजी सुरकर विभागीय सचिव राष्ट्रीय पेन्शनर्स फेडरेशन दिल्ली व नुतन जी बांगरे राज्य सरचिटणीस मरा सेनि प्रा शिक्षक व कर्मचारी संघटना हे मार्गदर्शक म्हणून तर माजी सभापती तथा माजी उपसभापती पस मौदा मा गटविकास अधिकारी मा गटशिक्षणाधिकारी पंस मौदा इत्यादी अधिकारी उपस्थित रहाणार आहेत.

महाराष्ट्रातील सेवानिवृत्त शिक्षकांच्या विविध समस्या आणि हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य उच्च श्रेणी मुख्याध्यापक व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक महासभा नागपूर आहे.

सेवानिवृत्तांना अंशदान राशीकरण आणि उपदान मिळवून देण्यासाठी सन २०२३ मध्ये पोस्टकार्ड आंदोलन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, शिक्षणमंत्री यांच्या वारंवार भेटी आणि निवेदन देऊन दबाव निर्माण करण्यात महासभेने महत्त्वाची भूमिका बजावली. नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती समोर एकाच दिवशी धरणे आणि थाळीनाद आंदोलन, विधानसभेवर भव्य मोर्चा काढून शासनाकडून अनुदान प्राप्त करून घेणारी महाराष्ट्रतील एकमेव संघटना ठरली.
या महासभेचे २४वे भव्य जिल्हा अधिवेशन धनजोडे सभागृह मौदा येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी अधिवेशनाला उपस्थित राहावे आणि अन्य सेवानिवृत्तांना उपस्थित राहण्यासाठी प्रेरीत करून महासभा बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.

पत्रकार परिषदेला महासभेचे अध्यक्ष अशोक दगडे, सरचिटणीस दिपक सावरकर, विनोद राऊत, पत्रकार प्रशांत पवार . पत्रकार गोपायकडू पत्रकार प्रा सुनील मोहोड . पत्रकार संजय वाळके पत्रकार रमेश चव्हाण व मुरलीधर कामडी ज्ञानेश्वर वानखेडे, संजय भेंडे, , जयदेव टाले, सुधाकर भुरके, अनिल नागपुरे, गोपाल कडू, रामदास काकडे, दिपक तिडके, नबी शेख, रामभाऊ ठाकरे, दामोदर झाडे, शशी पाटील, सुनिता दामले, मालती आगरकर, अशोक तपासे, श्रीराम वाघे, प्रविण बेले, नरेश गिन्हे . लक्ष्मण कवडे . रमेशा किरपान . प्रभू कुल्लरकर कर शंकर बेंडे .आणि इतर जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते. असे जिल्हा महासंघाचे प्रवक्ता मुरलीधर कामडे यांनी कळविले.