२१ वर्षांत २१,००० शेतकरी आत्महत्या

0

वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पाशिवाय पर्याय नाही: जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांची मागणी

नागपूर (Nagpur) : पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सिंचन सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणे आवश्यक असल्याचे मत जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांनी व्यक्त केले आहे. २००१ पासून ऑक्टोबर २०२४ पर्यंतच्या कालावधीत पश्चिम विदर्भात २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.

गेल्या २१ वर्षांत तब्बल २०,९८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शासनाच्या मदतीची मदत फक्त ९५६८ प्रकरणांत देण्यात आली, तर १०,८२२ प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली आहेत. शिवाय, ३४९ प्रकरणे वर्षभरापासून चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प त्वरित सुरू करावा, अशी मागणी डॉ. महाजन यांनी केली आहे.