

उत्तर उमरेड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या देवळी उपवनक्षेत्रात वन्य प्राण्याना पाणी मिळावे या करिता देवळी उपवनक्षेत्रातील कार्यरत कर्मचाऱ्यांसाह क्रत्रिम पाणवठे तयार केले उन्हाळ्याच्या दिवसात पक्षी आणि वन्यजीवाना पाणी मिळावे या करिता देवळी उपवनक्षेत्रातील मेंढेपठार व पांजरेपार बिटातील वनक्षेत्रात ज्या ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नाही अशा क्षेत्राची निवड करून श्रमदान ड्राइव्ह मिशन अंतर्गत 20 पाणवठे बांधण्यात आले व श्रमदान ड्राइव्ह मिशनची सुरवात करण्यात आली तसेच तेलाच्या रिकाम्या पिप्या पासुन निसर्गातील/जंगलातील लहान मोठे पक्षी यांना पाणी व खाद्य चारा भेटेल या करिता 20 खाऊ घर तयार करून प्रत्येक खाऊ घरा मध्ये अनाज,ज्वारी, बाजरी व पाणी भरून जंगल भागातील आतील भागात झाडावर बांधण्यात आले.
वन्यप्राणी व पक्षी यांच्या जीवहितार्थ अशा प्रकारचे 30 क्रत्रिम पाणवठे श्रमदान ड्राइव्ह मिशन अंतर्गत तयार करण्याचा संकल्प असल्याचा मानस श्री एस.डी चाटे क्षेत्र सहाय्यक देवळी यांनी केला या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक वनसंरक्षक श्री मनोज धनविजय उत्तर उमरेड वनपरिक्षेत्र अधिकारी श्री पी बी बाभळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
या वेळी क्षेत्रसहाय्यक देवळी श्री एस डी चाटे ,वनरक्षक आर आर चव्हान,व्ही एस शेंडे ,वाय एस नेहारे ,आर डी गुरनुले ने स्थायी व अस्थायी वनमजुर उपस्थित होते