

– सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती
नागपूर (Nagpur), दि.१३: सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अभियंता दिनाच्या निमित्ताने ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार २०२३-२४’ कार्यक्रमाचे आयोजन रविवार, १५ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभियंत्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे सकाळी १०.३० वाजता होणा-या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप्पर मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटनकर-म्हैसकर उपस्थित राहणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंके, सचिव (इमारती) संजय दशपुते, सचिव सतीश कोळीकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव सतिश चिखलीकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील तसेच विकास रामगुंडे सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार, अधिक्षक अभियंता जनार्दन भानुसे आदी उपस्थित राहणार आहेत.