पीएम किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता आज खात्यात जमा होणार

0

(New Dellhi)नवी दिल्ली : देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीम किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशातील सुमारे साडेआठ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान निधीचा हा हप्ता जारी करणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात 17 हजार कोटी रुपये जमा होणार आहेत. (PM Kisan Samman Nidhi Yojana) राजस्थानमधील सीकरमध्ये यानिमित्ताने एक कार्यक्रम होणार आहे. त्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल.

पीएम किसान योजना 4 वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. याअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6,000 रुपये तीन हप्त्यांमध्ये जमा केले जातात. फेब्रुवारी 2019 पासून देशातील 11 कोटींहून अधिक शेतकर्‍यांना 2.42 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित झाली आहे. याशिवाय सरकार देशातील किरकोळ खतांची दुकाने टप्प्याटप्प्याने पीएम किसान समृद्धी केंद्रात रूपांतरित करणार आहे. या केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी कच्चा माल, माती परीक्षण, बियाणे आणि खते पुरविण्यात येणार असून यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही.