
मुंबई -मागील अडीच वर्षात मला मतदार संघात निधी मिळतच नव्हता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि शेकडो कोटींचा निधी मिळाला आहे.माझी १३ वर्षांची आमदारकी फुकट गेली, कारण निधी मिळत नव्हता असा आरोप आ प्रताप सरनाईक यांनी केला.
एकनाथ शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधी आमदारांनाही निधी दिला आहे. मी मुख्यमंत्री यांना नायकची प्रतिमा भेट दिली. एका बाजूला अनिल कपूर आणि एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे.
दरम्यान, ओम राऊत यांना मी पत्र लिहिले आहे. मला तो माझा मित्र असल्याचा अभिमान वाटायचा पण आदीपुरुष चित्रपटात रामायणाचे विद्रुपीकरण करण्यात आले, त्याचे दुःख वाटले. माझे पत्र त्याने स्वीकारले आणि पुन्हा अशी चूक होणार नाही अशी कबुली दिली. सहकाऱ्यांना मंत्री पदाबाबत दिलेला शब्द शिंदे आणि फडणवीस साहेब पाळणार असा दावा केला.
युवक काँग्रेसने रस्त्यावर नारळ फोडत केला सरकारचा निषेध
नांदेड- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पासदगांव इथल्या आसना पुलाच्या कामाचे भूमिपूजन वर्षांपूर्वी झाले होते, मात्र अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे युवक काँग्रेसने रस्त्यावर नारळ फोडत सरकारचा निषेध नोंदवला. या सरकार कडून फक्त नारळ फोडण्यात येतात मात्र विकास कामे होतच नाही,असा आरोप करत काँग्रेसने हे अभिनव आंदोलन केले. आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.