१२०० कृषी केंद्रांचा तीन दिवसीय संपात सहभाग

0

 

बुलढाणा- महाराष्ट्र शासनाकडील प्रस्तावित विधेयक क्रमांक ४० ते ४४ मधील जाचक नियमांना विरोध व प्रस्तावित पाचही कायदे रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी राज्यातील २ ते ४ नोव्हेंबर कृषी केंद्र बंद ठेवण्याची हाक संघटनेतर्फे देण्यात आली होती. संघटनेने दिलेल्या या हाकेला प्रतिसाद देत बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास १२०० कृषी केंद्र चालकांनी यात सहभाग घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रे बंद आहेत.या बंदमुळे शेतकऱ्यांना या कृषी केंद्रातून मिळणाऱ्या मालापासून वंचित राहावे लागणार आहे. या बंदबाबतचे निवेदन संघटनेने सरकारला पाठविले आहे. या बंदमध्ये खामगाव शहरातील ४२ कृषी केंद्रचालकांनी पण आपला सहभाग नोंदविला असल्याची माहिती श्रीकिशन पुरवार (कृषी केंद्र सघटना जिल्हा सचिव) यांनी दिली.