

यवतमाळ YAVATMAL – वनविभागाच्या वतीने वनरक्षकाच्या 79 जागांसाठी उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जात आहे. यामध्ये तब्बल 11 हजार उमेदवार महिला व पुरुष 5 किलोमीटर धावणार आहेत. ही मैदानी चाचणी यवतमाळच्या नागपूर तुळजापूर महामार्गावर घेतली जात आहे. यामध्ये यवतमाळ वन वृत्तासाठी लेखी परीक्षा 120 गुणांची राहणार आहे. चौदा हजार 96 लोकांनी लेखी परीक्षा दिली. असून यामध्ये उमेदवारांची धाव चाचणी 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत सुरू आहे. यामध्ये एकाच दिवशी कागदपत्र तपासणी, शारीरिक पात्रता तपासणी, आणि धाव चाचणी, घेतली जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक वनसंरक्षक वसंत घुले यांनी दिली.