१० वर्षाच्या मुलाने केले सरपंच पदाचे आरक्षणाची चिठ्ठी

0
१० वर्षाच्या मुलाने केले सरपंच पदाचे आरक्षणाची चिठ्ठी
१० वर्षाच्या मुलाने केले सरपंच पदाचे आरक्षणाची चिठ्ठी

सेलू तालुक्यातील 36 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ता. 18 बुधवारला दुपारी 12.30 वाजता तहसीलदार मलिक विराणी यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात आरक्षण सोडत घेण्यात आले. 10 वर्षाच्या शालेय विद्यार्थ्याच्या हाताने चिठ्ठी काढून सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. 36 ग्रामपंचायतपैकी 17 ग्रामपंचायतचे सरपंच हे विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे.

1 जानेवारी 2024 ते 4 मार्च 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तालुक्यातील 36 ग्रामपंचायत सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षणासाठी राजकीय लोकांची सभा घेऊन आरक्षण जाहीर करण्यात आले. केळझर, झडशी, सुकळी बाई, आकोली, कान्हापुर, देऊळगाव, वडगांव खुर्द, तळोदी, वाहितपुर व खडका येथील सरपंच खुल्या वर्गासाठी राखीव करण्यात आले. दहेगाव गोसावी, दिग्रज, जुनगड, येनकापुर रमना, कोटंबा, सोडी, पिपळगाव, गिरोली ढगे व नवरगाव सर्वसाधारण महिलांकरिता राखीव. सेलडोह, सुरगाव आणि वडगांव जंगली नामाप्र तर हेलोडी, बोरी कोकाटे, सालई कला, नानबर्डी येथे नामाप्र महिला सरपंच राहणार आहेत. हमदापुर, चाणकी, खैरी (कामठी) अनुसूचित जाती जमाती खुला वर्ग तर घोराड, पळसगाव बाई व टाकळी (झडशी) अनुसूचित जाती जमाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. रेहकी कला, वडगांव कला, धानोली मेघे अनुसूचित जाती करिता आरक्षित ठेवण्यात आले.

सरपंच पदाचे आरक्षण तहसीलदार मलिक विराणी, नायब तहसीलदार निवडणूक राम कांबळे, नायब तहसीलदार राजकुमार मंथनवार आणि तालुक्यातील राजकीय लोकांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली.

 

Selu in marathi name
Selu in marathi meaning
Selu in marathi map
सेलू तालुक्यातील गावांची यादी
सेलू तालुका नकाशा
Selu taluka
पाथरी तालुका नकाशा
Pathri