

महिला सक्षमीकरणासाठी पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या विमा सखी योजने ( एनडीआईएस )अंतर्गत सी. पी. अँड बेरार महाविद्यालयात बीमा सखी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात सुमारे 100 विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला.
एलआयसीच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या मेळाव्यात एलआयसीचे विमा एजंट बनण्यासाठी आवश्यक असलेली आयआरडीएची परीक्षा उत्तीर्ण करण्याकरिता आवश्यक असलेले तीन दिवसाचे प्रशिक्षण देखील एलआयसीद्वारे देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा सात हजार आणि कमिशन देण्याची तरतूद आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता एलआयसीद्वारे तसेच महाविद्यालयाद्वारे विद्यार्थिनींना प्रोत्साहित करण्यात आले.
एलआयसीचे प्रवीण काळे यांनी एलआयसीची भूमिका आणि विमा सखी योजनेची विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद जोशी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. मेधा कानेटकर यांनी केले तर डॉ. दीक्षित यांनी आभार मानले. श्रीकांत पांडे व किशोर भीमाशंकर यावेळी उपस्थित होते.