सिमेंट काँक्रिटचे रस्ते आता आम्हाला नको

0

सिमेंट काँक्रिटचे रस्ते आता आम्हाला नको
व्हेरायटी चौक ते संविधान चौकापर्यंत जनआंदोलन

शहरात अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्यांचे काम सुरू आहे. विशेषत: दक्षिण-पश्चिम नागपुरात रिंग रोड ते ऑरेंज स्ट्रीट, मानेवाडा ते बेसा रोड, जयताळा रोड तसेच प्रतापनगरकडे जाणाऱ्या चार ते पाच मोठ्या मार्गांवर सिमेंट रस्त्यांचा काम सुरू आहे. मात्र, हे काम अतिशय संथ गतीने होत आहे. त्यामुळे विशेषत: महिला व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे अखेर ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता व्हेरायटी चौक गांधीजींच्या पुतळ्यापासून तर संविधान चौकापर्यंत जनआंदोलन झाले. सिमेंट काँक्रिटचे रस्ते आता आम्हाला नको, या मोहिमेसाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.

अर्धा रस्ता तयार झाल्यावर एक बाजू उंच झाली आहे. मात्र, कंत्राटदाराने तेथे बॅरिकेट्स लावलेलेच नाही. त्यामुळे त्रिमूर्तीनगर चौकाकडून ऑरेंज स्ट्रीटकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. वाहने सिमेंट रस्त्याच्या खाली उतरून लोक पडत आहे. विशेषत: महिला व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत आहे. याविरोधात तक्रारी करूनदेखील नासुप्रचे अधिकारी व कंत्राटदार यांनी काहीच पावले उचलली नव्हती.

2018 मध्ये सगळ्यात आधी पाणी आलं होतं. त्यानंतर आता २०२३ आणि यंदा २०२४ मध्ये पुन्हा आलं. सर्वत्र डांबरी रस्ते खोदून सिमेंट रस्ते होतात. जिथे खूप जास्त ट्रॅफिक जमा होत आहे. गल्लो गल्ली सिमेंट नको, अशी नागरिकांची मागणी आहे. सिमेंटमुळे तापमान वाढत आहे. त्यामुळे नागपूरकरांना त्रास होत आहे.

सीमेंट कंक्रीट के सड़कें अब हमें नहीं चाहिए

वेरायटी चौक से संविधान चौक तक जन आंदोलन

नागपुर- शहर के कई स्थानों पर सीमेंट की सड़कें बन रही हैं। विशेषकर दक्षिण-पश्चिम नागपुर में रिंग रोड से ऑरेंज स्ट्रीट, मानेवाडा से बेसा रोड, जयताला रोड और प्रतापनगर की ओर जाने वाले चार से पांच बड़े मार्गों पर सीमेंट सड़कें बनाई जा रही हैं। हालांकि, यह काम बहुत ही धीमी गति से हो रहा है, जिससे विशेषकर महिलाओं और वरिष्ठ नागरिकों को परेशानी हो रही है। इसलिए, आखिरकार 11 अगस्त को सुबह 10 बजे वेरायटी चौक गांधीजी की प्रतिमा से संविधान चौक तक जन आंदोलन किया गया। “सीमेंट कंक्रीट की सड़कें अब हमें नहीं चाहिए” इस अभियान के लिए हस्ताक्षर अभियान चलाया गया।

आधे रास्ते का निर्माण होने के बाद एक ओर की सतह ऊंची हो गई है। हालांकि, ठेकेदार ने वहां बैरिकेड्स नहीं लगाए हैं, जिससे त्रिमूर्ति नगर चौक से ऑरेंज स्ट्रीट की ओर जाने वाले मार्ग पर कई दुर्घटनाएं हुई हैं। वाहन सीमेंट की सड़क के नीचे उतरकर लोग गिर रहे हैं। विशेषकर महिलाओं और वरिष्ठ नागरिकों को कठिनाई हो रही है। इसके खिलाफ शिकायतें करने के बावजूद, नासुप्र के अधिकारी और ठेकेदार ने कोई कदम नहीं उठाया।

2018 में सबसे पहले पानी आया था। अब 2023 और इस साल 2024 में फिर से आया है। हर जगह डामर की सड़कों को खोदकर सीमेंट की सड़कें बनाई जा रही हैं, जहां अत्यधिक ट्रैफिक होता है। गलियों में सीमेंट की सड़कें नहीं चाहिए, ऐसी नागरिकों की मांग है। सीमेंट के कारण तापमान बढ़ रहा है, जिससे नागपुरवासियों को परेशानी हो रही है।