

घुग्घुसमध्ये सर्वधर्मीय महाआरती, सलग नऊ वर्षांपासून सर्वधर्म समभावाचा संदेश कायम!
घुग्घुस : चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर असलेल्या घुग्घुसमध्ये, मागील नऊ वर्षांपासून सुरू असलेली सर्वधर्मीय महाआरतीची परंपरा याही वर्षी कायम राहिली. काल (दि. ०१) शहरातील गांधी चौकात असलेल्या श्रीराम गणेश मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमात सर्वधर्मीय नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला. माजी मंत्री तथा आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते ही महाआरती करण्यात आली.
यावेळी घुग्घुसचे भूमिपुत्र आणि राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. देवरावदादा भोंगळे यांचीही विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमात विविध जाती-धर्मांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, ठाणेदार घुग्घुस प्रकाश राऊत, फादर वियानी स्कुल निखिल चकियाथ, निरीक्षण तांड्रा , नागराज कारपाका,अमोल थेरे, विनोद चौधरी, चिन्नाजी नलभोगा,सुनिल बाम,धनराज पारखी, सुरेंद्र जोगी, सुरेंद्र भोंगळे, विवेक तिवारी व प्रयास बँकेच्या मार्गदर्शिका सौ.अर्चना भोंगळे, प्रयास बँकेच्या अध्यक्ष सौ.किरण बोढे, माजी.ग्रा.पं.घुग्घुस सौ.वैशाली ढवस, सौ.सुचिता लुटे, सौ.सुषमा सावे यांचेसह हिंदू समाजातील ,प्रेमलाल पारधी, संजय भोंगळे, रत्नेश सिंग, गजानन चिंचोलकर, मधुकर मालेकर, रामअवतार पांडे मुस्लिम समाजातील, हसन शेख, मोमिन शेख, इर्शाद कुरेशी, तस्लिम अहमद,अमीन कुरेशी बौद्ध समाजातील, बबलु सातपुते, हेमंत पाझारे, अतुल चोखांद्रे,सिनु रामटेके, सिनु कोट्टूर,प्रवेश सोदारी,ख्रिस्ती समाजातील, निरक्षण तांड्रा,नेहमिया नगराळे, सि.एच.देविदास, अशोक अटकुर, सागर तांड्रा आणि शीख समाजातील,संम्मत सिंग दारी,जतिंदर सिंग दारी, गुरजीत सिंग, सोनु सिंग, चंदा सिंग प्रमुख प्रतिनिधींचा समावेश होता.
यावेळी बोलताना आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले की, समाजात सलोखा आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी अशा उपक्रमांना विशेष महत्त्व असते. घुग्घूस हे मीनी इंडीया आहे. या शहरात देशभरातील सर्व धर्म-पंथ-समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात त्यामुळे ही महाआरती केवळ एक धार्मिक कृती नसून, शहरात सौहार्द निर्माण करणारी एक सामाजिक चळवळ आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.
पुढे बोलताना, या महाआरतीमुळे समाजात एकोप्याचा आणि सलोख्याचा संदेश जातो, असे सांगत त्यांनी या अखंड परंपरेचे कौतुकही केले.
ही महाआरती म्हणजे ‘सर्वधर्म समभाव’ या मूल्यांची प्रेरणा देणारी – आमदार देवराव भोंगळे
घुग्घुस हे जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर असल्याने येथे विविध जाती, धर्म आणि पंथांचे लोक आनंदाने राहतात आणि हीच भावना या महाआरतीमधून स्पष्टपणे दिसून येते. श्रीराम गणेश मंडळातर्फे गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने चाललेल्या या उपक्रमामुळे समाजातील सलोखा आणि बंधुभाव दृढ होत आहे. ही परंपरा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून, ‘सर्वधर्म समभाव’ या मूल्यांची प्रेरणा देणारा एक महत्त्वाचा उपक्रम बनला आहे. असे मनोगत आमदार देवरावदादा भोंगळे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी तुलसीदास ढवस, उमेश दडमल, हेमंत कुमार, अजगर खान, गणेश कुटेमाटे,श्रीकांत सावे, सतिश बोंडे, पियूष भोंगळे, स्वप्नील इंगोले, कुलदीप इंगोले, शंकर सिद्दम, मधुकर धांडे, विनोद जंजिर्ल, वसंत भोंगळे, मारोती मांढरे, सुरेंद्र झाडे, सुशिल डांगे, सुनील राम, योगेश घोडके, गोविंद घोडके, रवी घोडके, कोमल ठाकरे, प्रमोद भोस्कर, रोशन अतकर, सुधाकर आसुटकर, राजु काळे, गणेश राजुरकर, श्रीकांत बहादुर, सचिन नांदे, शिव कुमार,मूर्ती पेरपुल्ला,गोलु जोगी,बेगम शेख,नजमा कुरेशी, सारिका भोंगळे, सिमा पारखी, शिल्पा थेरे, अर्चना चटकी, सुरेखा डाखरे, चंद्रकला मन्ने व जय श्रीराम गणेश मंडळ चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.