सना पंडित यांच्या दोन पुस्‍तकांचे 6 मार्च रोजी प्रकाशन

0

(Nagpur)नागपूर, 4 मार्च
विदर्भ साहित्य संघ आणि वर्णमुद्रा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, 6 मार्च 2025 रोजी सायं. 6 वा. वि. सा. संघाच्या अमेय दालनात कवयित्री व लेखिका सना पंडित यांच्या ‘अंतरंग’ (ललित) आणि ‘अभिसारिका’ (दीर्घकाव्य) या दोन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एलआयटी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अतुल वैद्य उपस्‍थ‍ित राहणार असून अध्यक्षस्थानी वनराईचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी राहतील. विशेष अतिथी म्हणून विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, डिजिटल तरुण भारतचे संपादक शैलेश पांडे, वि. सा. संघाच्या कार्यकारिणी सदस्य संयोगिता धनवटे यांची उपस्थिती राहणार आहे. ‘अभिसारिका’ या पुस्तकावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश एदलाबादकर तर ‘अंतरंग’ या पुस्तकावर प्रा. डॉ. राजेंद्र नाईकवाडे भाष्य करतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली देशपांडे करतील.
या कार्यक्रमात मोठ्या संख्‍येने सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ साहित्य संघ, वर्णमुद्रा प्रकाशन आणि श्री सिद्धिविनायक पब्लिसिटी तर्फे करण्यात आले आहे.