“व्होटेथॉन” च्या माध्यमातून “नागपूरकर, मतदान कर” चा संदेश

0

– मतदान जनजागृतीसाठी धावले नागपूरकर
– “व्होटेथॉन” स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
– आकर्षक वेशभूषा, युवक-युवती, नागरिकांचा लक्षणीय सहभाग

नागपूर -विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नागपूर शहरातील मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता ‘मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग’ अर्थात स्वीप कार्यक्रम अंतर्गत नागपूर महानगरपालिका,जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “व्होटेथॉन” मतदार जनजागृती दौड स्पर्धेला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. या माध्यमातून “नागपूरकर, मतदान कर” असा संदेश देण्यात आला.

शनिवारी 9 नोव्हें. ला सकाळी धंतोली स्थित यशवंत स्टेडियम येथे आयोजित “व्होटेथॉन” मतदार जनजागृती दौड 5 किलोमीटर आणि फन रनला नागपूरचे निवडणूक निरीक्षक श्री. भोर सिंग, श्री. सुनील कुमार, श्री. पवनकुमार सिंन्हा, नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक महामुनी, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी हिरवा झेंडा दाखवित सुरूवात केली.

याप्रसंगी भारतीय निवडणूक आयोगाच्या स्वीप आयकॉन व आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू श्रीमती सुवर्णा राज, मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, नागपूर जिल्हापरिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कपील कलोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, समाज कल्याण सहायक आयुक्त श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पल्लवी धात्रक, मनपाचे उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, श्री. प्रकाश वराडे, श्री. गणेश राठोड, श्री. विजय देशमुख, डॉ. गजेंद्र महल्ले, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांच्यासह मनपा, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. “व्होटेथॉन”च्या प्रारंभी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक महामुनी यांनी उपस्थित सर्वाना मतदानाची प्रतिज्ञा दिली. एक स्वरात प्रतिज्ञा घेत उपस्थितांनी आम्ही मतदान करणार असा संदेश दिला.

“व्होटेथॉन” मतदार जनजागृती दौड स्पर्धेत मतदार विद्यार्थी, पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या महिला जवान, सर्व सामान्य नागरिकयांच्यासह शासकीय व खाजगी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लक्षणीय सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ज्येष्ठ धावपटू आणि चिमुकल्यांनी ही सहभाग नोंदविला. याठिकाणी झुम्बा, डान्स, रनींग, फन वॉक, फॅन्सी ड्रेस आदी विविध माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. नागपूर शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे याकरिता ज्येष्ठ नागरिकांद्वारे गोंधळ, लोकगीत सादर करण्यात आले. तसेच अमित स्पोर्ट अकादमीच्या योगपटूद्वारे चित्तथरारक योग प्रात्यक्षिक सादर करीत नागरिकांनी अधिकाधिक संख्येत मतदान करावे असा संदेश दिला. सकाळच्या गुलाबी थंडीत झुम्बा नृत्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साह संचारला. यावेळी व्ही जे अमोल यांनी लहान फन गेम्स घेतले त्यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांनी नागरिकांनी मतदानासाठी पुढे येत, मी स्वतः मतदान करणार व इतरांना ही मतदानासाठी प्रोत्साहित करणार असा प्रण घ्यावा, असे आवाहन केले.

तर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, नागपूर शहर नेहमीच चांगल्या कामांमध्ये प्रथम येण्यासाठी अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील जास्तीत जास्त मतदान करून राज्यातून प्रथम येण्याचा प्रयत्न नागपूरकरांनी करावा, प्रत्येक मतदार, हा प्रशासनाचा आयकॉन असून, मतदानाच्या दिवशी स्वतः मतदान करीत इतरांना मतदानासाठी प्रेरित करावे असे आवाहन आयुक्त डॉ. चौधरी यांनी केले. , जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागपूरला ७५ टक्के डिस्टिंक्शन सह पास करूया म्हणत नागपूरकर, मतदान कर” असा संदेश दिला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक महामुनी यांनी प्रशासनाच्यावतीने स्वीप अंतर्गत घेण्यात येत असलेल्या विविध स्पर्धांची माहिती दिली. तर भारतीय निवडणूक आयोगाच्या स्वीप आयकॉन व दिव्यांग खेळाडू श्रीमती सुवर्णा राज यांनी प्रशासन प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी उत्तम सोयीसुविधा करून देत आहे. मतदारांनी देखील याचा फायदा घेत घराबाहेर पडून मोठ्या संख्ये मतदान करावे आये आवाहन केले. निवडणूक निरीक्षक श्री. सुनील कुमार यांनी विधानसभा निवडणुकीत नागपूरकर रेकॉड ब्रेक कामगिरी करीत मतदान करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तर निवडणूक निरीक्षक पवनकुमार सिंन्हा यांनी “व्होटेथॉन”तून निर्माण झालेला उत्साह मतदानाच्या दिवसा पर्यत तसाच कायम ठेवावा आणि मतदानासाठी अधिकाधिक संख्येत मतदान करावे असे आवाहन केले.

“व्होटेथॉन” दरम्यान घेण्यात आलेल्या 5 किलोमीटर स्पर्धेतील विजेत्या खालीलप्रमाणे:
महिला:
प्रथम: अंजली मडावी
द्वितीय: रिता तरारे
तृतीय : सुचिता वडामे
चतुर्थ: निकिता साहू
पाच: रितू मडावी
पुरुष
प्रथम: गौरव खडटकर
द्वितीय: मनीष पथे
तृतीय : अभय मस्के
चतुर्थ: रोहित राहंगडाले
पाच: मोहित कोरे
छोटे खेळाडू क्रमानुसार
मुलं: सौरभ भट्ट (७ वर्ष), लक्ष पटेल(८ वर्ष) अद्वित भोसले(९ वर्ष)
मुली: आर्या टाकोने(६ वर्ष), नव्या बाराई(१० वर्ष),श्रावणी लसने (१२ वर्ष)
ज्येष्ठ नागरिक
सर्वश्री. दिवाकर भोयर(७९ वर्ष), दामोधर वानखेडे(६५ वर्ष) संतोष तायडे(४७ वर्ष)
महिला
श्रीमती रेणू सिद्धू (४९ वर्ष )

फॅन्सी ड्रेस
– संतोषी धूम, दिव्या घुमने, जीवा सूर्यवंशी, रुद्र टाकोने,
सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले