विदर्भस्तरीय खासदार चषक समूहगीत गायन स्पर्धेला प्रारंभ

0

पहिल्‍या दिवशी 27 शाळांच्‍या विद्यार्थ्‍यांनी घेतला भाग

नागपूर (Nagpur) 4 ऑगस्‍ट :- 

बालकला अकादमी व स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील शाळांसाठी आयोजित करण्‍यात आलेल्‍या राष्ट्रभक्तीपर खासदार चषक समूहगीत गायन स्पर्धेच्‍या प्राथमिक फेरीला सोमवारी प्रारंभ झाला. कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू झालेल्‍या या स्‍पर्धेच्‍या आज पहिल्‍या दिवशी वर्ग 1 ते 5 या ‘अ’ गटातील प्राथमिक फेरीमध्‍ये नागपूरसह विदर्भातील 27 शाळांनी सहभाग नोंदवला.

सकाळी नऊ वाजल्‍यापासून भट सभागृहात शाळकरी मुलांची गर्दी बघायला मिळाली. विविध शाळांतून आलेल्‍या मुलामुलींच्‍या समूहाने प्रत्‍येकी दोन गीते सादर केली. यावेळी बालकला अकादमीच्‍या अध्‍यक्ष मधुरा गडकरी, स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्‍या सीमा फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘ब’ गटाची प्राथमिक फेरी 6 ऑगस्‍ट रोजी सकाळी 8.30 वाजेपासून सुरेश भट सभागृहात होणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार, 16 ऑगस्ट रोजी स्मृती भवन, रेशीमबाग येथे होईल.