मत चोरीच्या विरोधात आक्रोश मोर्चा

0

लोकशाही बचाव अभियानातर्फे वर्ध्यात आक्रोश मोर्चा

वर्ध्यातील लोकशाही मानणारे राजकीय पक्ष व सामाजिक संघटना मोर्चात सहभागी

वर्धा :- लोकशाही बचाव अभियानातर्फे वर्ध्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. मत चोरीच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून  या मोर्चाला सुरुवात करण्यात आलीय. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, सी पी आय , प्रहार अशा विविध संघटना यात सहभागी झाल्या आहेय. हातात तिरंगा घेत अनेकजण या मोर्चात सहभागी झाले आहेय.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला मोर्चा बडे चौक, सोशालिस्ट चौक, बजाज चौक, इतवारा, झाशी राणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर  धडकलाय.

मतदाराच्या डिजिटल याद्या जाहीर करून सर्व पक्षांना डाटा उपलब्ध करून द्यावा, ज्यामुळे त्यातील बोगस मतदान काढता येईल.   येणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या यासह विविध मागण्या या मोर्चातून करण्यात आल्या आहे. मोर्चात नितेश कराळे, बाळा जगताप, शेखर शेंडे, अभ्यूदय मेघे,  सुनील राऊत,सुधीर पांगुळ, बाळा माउस्कर, राजेंद्र शर्मा, द्वारका इमडवार, असलम खा पठाण, विकास दांडगे, संदीप किटे, पांढुरंग देशमुख आदी नेते सहभागी झालेय.
मोर्चातील सिस्ट मंडळानी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.