
यवतमाळ – भरधाव असलेल्या इंडिको कारने अचानक पेट घेतल्याची घटना यवतमाळच्या जगदंबा कॉलेज आर्णी रोड मार्गावर घडली आहे. या वाहनामध्ये तीन ते चार प्रवासी प्रवास करीत असताना चालत्या वाहनामध्ये शॉर्टसर्किट झाला आणि अचानक वाहनाने पेट घेतला. पेट घेताच वाहनातील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत ते वाहनाच्या खाली उतरले आणि त्यांनी लगेचच अग्निशमन दलाला माहिती दिली. दरम्यान अग्निशमन दलाने काही वेळातच घटनास्थळ गाठून ही आग आटोक्यात आणली.