चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे अपघात विमा क्लेम रकमेचे वाटप

0

 

चंद्रपुर (Chandrapur) :- 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत पगार होणारे जिल्हयातील ११५७९ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सिडीसीसी बँक सॅलरी पॅकेज अंतर्गत प्रत्येकी रू. ३०.०० लाख चा अपघात विमा बँकेतर्फे काढण्यांत आलेला आहे. जि.प. परीसर शाखेअंतर्गत पगार घेणारे बांधकाम विभाग चंद्रपूर येथील कार्यरत होते. स्व. देवराव रामजी सातपुते यांचा दि. २२.१२.२०२४ रोजी दुदैवाने अपघाती मृत्यु झाला.

बँकेचे सिडीसीसी बँक सॅलरी पॅकेज अंतर्गत बँकेच्या प्रमुख कार्यालयांत बँकेचे अध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी श्री. शिंदे यांचे हस्ते स्व. देवराव रामजी सातपुते यांचे वारस पत्नी श्रीमती ईश्वरा देवराव सातपुते यांना रू. ३०.०० लाख विमा क्लेम रक्कम अदा करण्यांत आली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष श्री. एस. जी. डोंगरे तथा समस्त संचालक मंडळ व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश्वर कल्याणकर हे उपस्थित होते.