अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शताब्दी समारोहाची सुरुवात

0
नागपूर(Nagpur): 4 सप्टेंबर 25 : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नागपूर शाखेतर्फे आज स्थानिक स्वराज्य संस्था दिवसाचे आयोजन स्थानिक इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात करण्यात आले होते. दरवर्षी हा दिवस स्थानिक स्वराज्य संस्थांची महती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साजरा केला जातो. संस्थेचे पहिले महासंचालक स्वर्गीय सीडी बर्फीवाला यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी या दिवसाचे आयोजन केले जाते. यावर्षी या कार्यक्रमासाठी नागपूर शंखनाद न्यूज चॅनलचे संपादक पत्रकार श्री सुनील कुहिकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सुरुवातीला डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीच्या सहयोगाने स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम व फायरमन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. यावेळी एकूण 52 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ अध्यापक श्री सुधाकर काळे यांनी विशेष प्रयत्न केले.
http://Centenary celebrations of All India Local Self-Government Organization begin
मुख्य कार्यक्रमांमध्ये स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम, अग्निशमन कर्मी अभ्यासक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था पदविका अभ्यासक्रम व स्थानिक स्वराज्य संस्था सेवा पदविका अभ्यासक्रम या अभ्यासक्रमातील मागील वर्षीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन अतिथींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमातील प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या अमर नारनवरे व श्रमिता खोब्रागडे या दोन विद्यार्थ्यांना स्वर्गीय मोहन जावडेकर स्मृती प्रथम पुरस्कार, द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या गायत्री चौधरी व अभिषेक देशपांडे या विद्यार्थ्यांना स्वर्गीय श्रीपाद मुजुमदार स्मृती पुरस्कार, तर तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या वैभव गावली व पराग टिकरे या विद्यार्थ्यांना स्वर्गीय रितेश हेरॉल्ड स्मृती पुरस्कार, अग्निशमन कर्मी अभ्यासक्रमातील प्रथम आलेल्या लोकेश भलमे व शुभम राऊत या विद्यार्थ्यांना अग्निशमन अधिकारी स्वर्गीय हरिदास वायगोकर स्मृती पुरस्कार, तर एलएसजीडी व एलजीएस या अभ्यासक्रमांमध्ये प्रथम आलेल्या नगरपालिकांमधे कार्यरत विक्रम मानकर विशाल सोनी व कल्याण खोब्रागडे या गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकारी स्वर्गीय एम.पी. टांकसाळे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्वर्गीय हरिदास वायगोकर यांच्या अग्निशमन अभ्यासक्रमातील उपयुक्त उपकरणे घेण्यासाठी त्यांच्या परिवारातर्फे एक राशी देखील संस्थेतला देणगी म्हणून सुपूर्त करण्यात आली. यावर्षी संस्थेचे शताब्दी वर्ष सुरू झालेले असून त्यानिमित्ताने आयोजित हा पहिला कार्यक्रम असून वर्षभर देशभरात आणि नागपुरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेकडून केले जाणार आहे अशी माहिती संस्थेचे विभागीय संचालक श्री जयंत पाठक यांनी प्रास्ताविक करताना दिली.

प्रमुख अतिथी श्री सुनील कुहिकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे देशाच्या विकासात असलेले महत्त्व सांगून त्याकरिता सक्षमता निर्माण करण्याचे संस्थेचे प्रयत्न अत्यंत अभिनंदनिय आहेत, या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम व वायरमन चा अभ्यासक्रम असे चाकोरी बाहेरील अभ्यासक्रम निवडल्याबद्दल त्यांचे त्यांनी अभिनंदन केले. मुख्य कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी पथनाट्य, नृत्य, गायन असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले. या कार्यक्रमाचे संचालन संस्थेच्या कार्यक्रम अधिकारी गुरु सिमरन कौर यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रमांचे संचालक कुमारी वृषाली रामटेके हिने केले. या कार्यक्रमाला सर्वच अभ्यासक्रमांचे विद्यार्थी अध्यापक व संस्थेचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती राही बापट,श्रीमती निशा व्यवहारे, श्रीमती मंजिरी जावडेकर, श्रीमती यशश्री परचुरे, जयंत राजुरकर, सुशील यादव, करण खंडाळे, कृष्ण पोटपोसे, दीपक वनारे व लक्ष्मी सोनवणे यांनी प्रयत्न केले.